...
बसमध्ये चढताना महिलेचे गंठण लंपास
अंबाजोगाई : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ज्ञानेश्वरी सत्यवान साळुंके (रा. घाटनांदूर) यांचे २० हजार रुपये किमतीचे १४ ग्रॅमचे गंठण लंपास केले. १९ ऑगस्टला ही घटना घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वरी साळुंके यांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
....
लिंबोडीत घरफोडी, संशयितावर गुन्हा
आष्टी : तालुक्यातील लिंबोडी येथे नवनाथ जगन्नाथ गर्जे यांच्या घरात शिरून चोरट्यांनी दोन मोबाईल, रोख ५०० रुपये, दागिने असा एकूण ७३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३१ जुलै रोजीच्या मध्यरात्री घडली. गर्जे यांच्या तक्रारीवरून तीन आठवड्यानंतर २१ ऑगस्टला आष्टी ठाण्यात संतोष जायभाये ऊर्फ बलमा (रा. कडा, ता. आष्टी) या संशयितावर गुन्हा नोंद करण्यात आला.
...
एटीएएमची आदलाबदल, ७२ हजार लांबविले
माजलगाव : हातचलाखीने कार्डची अदलाबदल करून ७२ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार येथे २० ऑगस्टला सावजी बँकेसमोरील एटीएममध्ये घडला. नीलावती श्रीराम चव्हाण (रा. मंजरथ रोड, माजलगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारायण पोहेकर (रा. मंगरूळ क्र. ३) यांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
...
केजमध्ये रिक्षाचालकास पाईपने मारहाण
केज : रिक्षा घेऊन चल असे म्हटल्यावर चालकाने नकार दिला. त्यामुळे त्यास लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शहरातील कानडी चौक भागात २१ ऑगस्टला घडली. रमेश रूपाजी जाधव (वय ३७, रा. समर्थनगर, केज) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे. भांडण सोडविण्यास आलेला पुतण्या रामा सुनील जाधव यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अजय गायकवाड (रा. क्रांतीनगर) याच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
....