जादा भाड्याचा भूर्दंड
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण परिसरात विविध भागांत खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. ग्रामीण भागात बस नसल्याने हा भूर्दंड सोसावा लागत आहे.
वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक
बीड : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडींमधून उसाची वाहतूक केली जाते. परंतु, या वाहनांमधून ऊस नेला जात असताना क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून नेला जात असल्याने अनेकवेळा वाहनांना याचा भार सोसला जात नाही. यामुळे अनेकवेळा या वाहनांचे अपघातही होत आहेत. तरीही याकडे संबंधित मालक, वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत.
बीडमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनींना कोरोना लस
बीड : येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींना बुधवारी जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोरोना लस देण्यात आली. विद्यार्थिनींनी सकाळपासूनच कोरोनाचे नियम पाळून लस घेण्यासाठी शिस्तीत रांगा लावल्या. त्यानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात बसून त्यांना वसतिगृहावर पाठविण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे, उपप्राचार्या शैलजा क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.