खरिपाच्या पेरण्यांना वेग
अंबेजोगाई : पाऊस चांगल्या प्रमाणात होत आहे. यामुळे खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. पाऊसही चांगला होत असल्याने, शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी अंबेजोगाई शहरात गर्दी होत असून, तालुक्यात अनेक ठिकाणी पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
थंडी-तापाचे रुग्ण वाढले
अंबेजोगाई : तालुक्यात आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन वेळा पाऊस पडला, तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी ऊन तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खासगी रुग्णालय हाउसफुल्ल होत असून, उपचार करून घेण्यासाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.
कर्जवसुली थांबविण्याची मागणी
अंबेजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजार पेठ बंद आहे. सर्व सामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्जवसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी होत आहे.