लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हळदी-कुंकवासाठी नातेवाईकांकडे निघालेल्या महिलांचे जवळपास दोन लाख रूपयांचे दागिने लंपास केले. यात एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. या घटना बुधवार व गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डॉ.ज्योती सुधीर राऊत (४१ रा.पांडुरंग नगर, बार्शी रोड, बीड) या आपल्या इतर दोन मैत्रीणींसह चार चाकी वाहनातून मोंढा रोड भागात आल्या. येथे उतरल्यानंतर त्यांनी एका नातेवाईकांकडे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपला. तेथून दुसरे घर जवळच असल्याने त्या तिघीही पायी निघाल्या. याचवेळी समोरून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. ‘बाजुला सरका, बाजुला सरका’ असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या गळ्यातील गंठण ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ गळ्याला हात लावला. त्यामुळे गंठणचा काही भागच चोरट्यांच्या हाती लागला. जवळपास २८ हजार रूपये किंमतीचे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. दरम्यान, डॉ.राऊत यांच्या गळ्यात जवळपास सात लाख रूपये किंंमतीचे दागिने होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र राऊत यांच्या सजगतेमुळे बाकीचे दागिने सुरक्षित राहिले. हा प्रकार त्यांनी तात्काळ घरच्यांना सांगितला. शहर पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या घटनेत रागिनी पांडुरंग बेदरे (रा.तिरूपती कॉलनी, बीड) या आपल्या तीन सुनांसह सुभाष रोडवर आल्या होत्या. हळदी-कुंकवाचा कार्यक्रमासाठी त्या पायी जात असतानाच पाठिमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी बेदरे यांच्या गळ्यातील तब्बल सहा तोळ्याचे गंठण लंपास केले. पापणी लवण्याआधीच चोरटे पसार झाले. गजबजलेल्या सुभाष रोडवर झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. रागिनी बेदरे यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून चोरट्यांविरोधात तक्रार दिली.दरम्यान, मकरसंक्रातीसाठी महिला आपल्या अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने ठेवतात. अनेकदा त्या निर्मनुष्य ठिकाणाहून जात असतात. अशा ठिकाणी चोरी करणे चोरट्यांना त्रासदायक ठरत नाही. मात्र ऐन सुभाष रोडवर गजबजलेल्या ठिकाणाहून गंठन लंपास केल्याने चोरट्यांचे चांगलेच मनोबल वाढल्याचे दिसत आहे.
हळदी-कुंकवासाठी निघालेल्या दोन महिलांचे गंठण लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:41 AM
हळदी-कुंकवासाठी नातेवाईकांकडे निघालेल्या महिलांचे जवळपास दोन लाख रूपयांचे दागिने लंपास केले. यात एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. या घटना बुधवार व गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देबीडमधील घटना : दुचाकीवरून आलेले चोरटे क्षणात पसार