सुजित सुरेश राऊत (२० ). सुमित संदीपान सिरसट (१८, दोघे रा. फुलेनगर, केज) अशी मृतांची नावे आहेत व गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण घेत असलेले विजयकुमार पांडुरग घोळवे (३५, रा. समतानगर, केज) हे दुचाकीवरून (एमएच ४४/एम-२३०३) मंगळवारी रात्री १ वाजता घराकडे जात होते. केज-बीड मार्गावर कानडी रोडवरील कांचन मेडिकलसमोर अज्ञात वाहनाने मागील बाजूने धडक दिली. या अपघातात सुजित राऊत, सुमित सिरसट हे दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर मोटारसायकल सुमारे १०० ते १५० फूट फरफटत नेली. गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेले विजयकुमार पांडुरग घोळवे यांच्या उजव्या पायाला व डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहन कळंब चौकातून सुसाट निघून गेले. अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्तामांसाचा सडा पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रमेश सानप, बाळासाहेब अहंकारे व चालक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला व जखमीलाही उपचारार्थ पाठविले.
-----
दोघांचेही स्वप्न अधुरे
अपघातात मृत्यू पावलेला सुमित संदीपान सिरसट हा नुकताच १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. २१ सप्टेंबर रोजी त्याने अंबाजोगाई येथे सीईटी परीक्षा दिली होती तर सुजित राऊत याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले असून तो केश कर्तनालयात काम करीत होता. मात्र, अपघाती मृत्यूने दोघांचीही स्वप्न अधुरे राहिले.
----------------
220921\22bed_14_22092021_14.jpg
मयत