शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांच्या संपर्क कार्यालयावर अजूनही उद्धव ठाकरेंचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 1:02 PM

चर्चेला उधाण : निवड होऊन महिना उलटला तरी बॅनर तेच कायम

बीड : शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संपर्क कार्यालयावर आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे आहेत. खांडे यांनी शिंदे गटात दाखल झाल्यानंतरही जुनेच बॅनर कायम ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

मागील काही महिन्यांत राज्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेत दोन गट पडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदही मिळविले. त्यानंतर राज्यभरात आपल्या गटाचे जाळे तयार केले. बीडमध्येही ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केलेले सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांना जवळ करत दोघांच्याही गळ्यात जिल्हा प्रमुखपदाची माळ टाकली. २८ जुलै २०२२ रोजी दोघांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले. दाेघेही धडाडीने कामाला लागले. शिंदे यांच्यासह सर्वच गट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना घेऊन पुढे जात आहेत. परंतु खांडे यांच्या संपर्क कार्यालयावर आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर कायम आहे. विशेष म्हणजे निवड होऊन महिना उलटला तरी हे बॅनर न बदलल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत कुंडलिक खांडे यांना तीन वेळा संपर्क केला, परंतु त्यांचा फोन बंद होता.

स्वागताच्या बॅनरवर शिंदेंचा फोटोखांडे यांची निवड झाल्यानंतर शहरभर बॅनरचे जाळे पसरले होते. यावर मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो पाहायला मिळाले. आजही अनेक जाहिराती आणि शुभेच्छापर बॅनरमध्ये शिंदे दिसतात. निवड झाल्यानंतर तयार झालेल्या एकाही बॅनरवर ठाकरे यांचा फोटो दिसला नाही.

टॅग्स :BeedबीडEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना