शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

काका, मामा, मावशी, ताई पाहू द्या बोट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:35 AM

गेवराई : काका, मामा, मावशी, ताई कोणाला ताप येतो का? खोकला आहे का? सर्दी, पडसं नाही ना, असे ...

गेवराई

: काका, मामा, मावशी, ताई कोणाला ताप येतो का? खोकला आहे का? सर्दी, पडसं नाही ना, असे प्रश्न विचारत पाहू द्या तुमचे बोट, असे म्हणत बोटाला ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन पातळी तपासण्याचे व नोंद घेण्याचे काम गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी करीत आहेत.

गेवराई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता घरोघरी जाऊन आजाराबाबत माहिती घेण्यासाठी झीरो डेथ मशीन मोहीम सुरू आहे. गेवराई तालुक्यातील सुमारे शिक्षक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात महिला शिक्षकांचाही समावेश आहे. ऑक्सिजन मापक यंत्र घेऊन नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांसह अन्य कर्मचारी थेट बांधावर जाऊन नागरिकांशी संवाद करीत आहेत. तहसीलदार सचिन खाडे, गट विकास अधिकारी अनुरुद्र सानप, गटशिक्षणाधिकारी मिलिंद तुरुकमारे, तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांच्या नियोजनातून ही मोहीम सुरू आहे.

कोरोनाचा धसका आता सर्वांनीच घेतला असल्याने मोहिमेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना आता नागरिकांकडूनही प्रतिसाद दिला जात असल्याचे दिसत आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उन्हातान्हात शेतात राबत आहेत. तर घर बंद असल्याने शेतावर बांधावर जाऊन माहिती घेत आणि तपासणी केली जात आहे. झीरो डेथ मिशन सर्वेक्षण तीन टप्प्यांमध्ये असून अंतिम गोषवारा लवकरच तयार होईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहे.

कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनीच गांभीर्य ठेवले पाहिजे. काही दिवस तरी हा सामूहिक लढा लढावा लागणार असून त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. नागरिकांनी नियमावलीचे उल्लंघन करू नये.

-संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी, गेवराई.

===Photopath===

100521\10bed_1_10052021_14.jpg