दुचाकी चोऱ्या वाढल्या
बीड : येथील अनेक शासकीय कार्यालयांच्या परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहन परत मिळेल याची खात्री नाही. यामुळे अनेक जण तक्रारही करीत नाहीत. यामुळे नागरिकांना मात्र फटका बसत असून, चोऱ्यांचा शोध लावण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे; परंतु अद्यापही याप्रकरणाला गांभीर्याने घेतले जात नाही.
अनधिकृत गतिरोधक
बीड : बीड ते तेलगाव या महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत गतिरोधक करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नियम धाब्यावर बसवून नागरिक, व्यावसायिकांच्या म्हणण्याप्रमाणे हे गतिरोधक बसविल्याचे समोर आले आहे. नियमाप्रमाणे गतिरोधक ठेवून होणारे अपघात टाळावेत व अनधिकृत गतिरोधक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या भागातील नागरिक, वाहनधारकांतून होत आहे.