लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील तळणेवाडी येथील एका महिला शेतकऱ्याने गायीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केेले होते. मंगळवारी गौराई विसर्जनाच्या दिवशी ‘लक्ष्मी गोमाते’चे पूजन डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या डोहाळे जेवणाची चर्चा सोशल मीडियावर तालुकाभर सुरू होती.
तळणेवाडी येथील पार्वती रामप्रसाद खरसाडे यांनी आपल्या गायीचे डोहाळे जेवण घालून हिंदू संस्कृती जोपासत एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. पोटच्या मुलीच्या लग्नानंतर ती गर्भवती राहिल्यावर माहेरी तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात केला जातो. त्याच प्रकारे हिंदू संस्कृतीत गायीला आई मानले जाते. याचीच जाण ठेवत तळणेवाडी येथील शेतकरी महिला पार्वती खरसाडे यांनी त्यांची गाय गर्भवती असल्याने मंगळवारी गोराई विसर्जनाच्या दिवशी ‘लक्ष्मी’ नावाच्या गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम केला. यावेळी गावातील महिलांनी लक्ष्मी गायीसाठी साडी चोळी देऊन तिला घास भरवून तिचे पूजन केले. गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शिलाबाई शेळके, सुजात धस, अश्विनी धस, सोमित्रा नरवडे, रुक्मिण इंगोले, मीराबाई लाड, नीता नरवडे, सुशिला नरवडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
150921\sakharam shinde_img-20210915-wa0023_14.jpg~150921\sakharam shinde_img-20210915-wa0024_14.jpg
गेवराई (जि.बीड) तालुक्यातील तळणेवाडी येथील एका महिला शेतक-याने गायीच्या डोहाळे जेवणानिमित्त गायीचे पूजन करताना महिला~