लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन ते ४ हजार दिव्यांग आणि विधवांची आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयावर आगळेवेगळे आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करु , असे लेखी आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले.अपंग आणि विधवांना प्रतिमाह एक हजार रु पये मानधन द्यावे, तसेच दोन रु पये किलो गहू व तीन रु पये किलो तांदूळ आणि घरकुल द्यावे, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयावर हे आंदोलन झाले. दरम्यान त्याआधी जमलेल्या प्रत्येक अपंगाच्या मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.अपंगांच्या समस्या व मागण्यांकडे शासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आयोजित या आंदोलनप्रसंगी जि.प. सदस्य अजय मुंडे, नगराध्यक्षा सरोजिनी हलगे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पं.स. उपसभापती पिंटू मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंदूलाल बियाणी, जि.प. सदस्य प्रा.मधुकर आघाव, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, बाळू लड्डा, ह.भ.प कोकाटे महाराज, अॅड. मंजित सुगरे, के.डी. उपाडे, दत्ता सावंत, अनंत इंगळे, नंदकिशोर मुंडे, शंकर कापसे, बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे, भगवान पौळ, गोविंद कराड, प्रणव परळीकर, अक्षय दळवी, सुभाष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.आंदोलनाच्या यशस्विततेसाठी अंध अपंग, मूकबधिर, विधवा, माजी सैनिक संघटनेचे सय्यद सुभान, साजन लोहिया, शेख फिरोज, शेख कादर, अनंतराव लोखंडे, अनंत बापू मुंडे, माणिक जाधव, संतोष आघाव, संजय नखाते, संदेश कापसे, प्रदीप भोकरे, इरफाना शेख, मुबारक शेख, शेख फुया, शेख हारा, शेख मीराज, सरताज खान, उद्धव फड, दत्ता काढे, ममता बद्दर, सुधाकर फड, केशव फड, विमल निलंगे, फुला पालेवाल, साहेबराव पवार, पुष्पा कांबळे, अनंत सौंदळे, दत्ता कराड, संभाजी गित्ते, गजानन मनाळे, पाटलोबा ढाकणे, वैजनाथ थोडके, मयूर शिंदे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ गित्ते, संजय घोबाळे महेश मुंडे आदींनी प्रयत्न केले.
परळीत राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 11:49 PM
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन ते ४ हजार दिव्यांग आणि विधवांची आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयावर आगळेवेगळे आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करु , असे लेखी आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले.
ठळक मुद्देचार हजार दिव्यांग, विधवा महिलांची मोफत आरोग्य तपासणी : विविध मागण्यांद्वारे वेधले शासनाचे लक्ष; महिलांचा लक्षवेधी सहभाग