बीड : बारा बलुतेदार, आठरा अलुदारांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. ओबीसी समुदायातील विविध जाती-धर्मातील नागरिकांनी पारंपरिक व्यवसाय उभारुन व वेशभूषा करुन आंदोलनात सहभाग नोंदवला होता.मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेती व्यवसायासह इतर छोटे,मोठे व्यावसायात नुकसान होत आहे. त्यामुळे ओबीसी महामंडळाचे कर्ज तातडीने माफ करावे, ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय कार्यान्वित करावे, फुले दाम्पत्यास भारतरत्न पुरस्कार द्यावा, बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, धनगर, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्यावा, राजकीय क्षेत्रात या समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, स्वाती राठोड आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कारवाई करावी, सोनाली माने हिचा खून करणाऱ्या आरोपीला अटक करुन कारवाई करावी, भोई समाजाला दुष्काळी परिस्थितीमुळे तलाव ठेका माफ करावा व घरकुल द्यावेत, मंदिराच्या इनामी जमीनी गुरव समाजाला द्याव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
बारा बलुतेदार महासंघाचे विविध मागण्यांसाठी अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:18 AM
बारा बलुतेदार, आठरा अलुदारांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देओबीसी महामंडळाचे कर्ज माफ करा : विविध समाजाने पारंपरिक व्यवसाय व वेषभूषा साकारुन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी