माजलगाव : वाड्याच्या भिंतीवरु न घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील हिवरा (बु ) येथे शनिवारी घडली आहे. ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील हिवरा बु येथील शेतकरी दत्ता पाराजी गाडेकर हे शनिवारी रात्री आपल्या वाड्यात कुटुंबियांसोबत जेवण करून बाजूलाच असलेल्या आपल्या दुसऱ्या घरात झोपण्यासाठी गेले. त्यावेळी घरात त्यांची आई झोपलेली होती. रात्री उशिरा आलेल्या भाऊ विष्णू पाराजी गाडेकर यांच्या लक्षात आले की, घरातील लोखंडी पेटी गायब आहे. ज्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. त्यांनी कुटुंबियांना उठून हा प्रकार सांगितला व आजूबाजूला शोधाशोध केली. त्यावेळी बाजूला लोखंडी पेटी पडलेल्या अवस्थेत दिसली परंतु त्यामधील रोख रक्कम तीस हजार रुपये व सोन्याचे मनी, गंठण, डोरले हे सर्व सोन्याचे दागिने अंदाजे किंमत दीड लाख रु पये लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा सर्व प्रकार अज्ञात चोरट्यांनी वाड्याच्या भिंतीवरुन घरात प्रवेश करून केला. तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरु द्ध दत्ता पाराजी गाडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे हे करत आहेत.
अज्ञात चोरट्यांनी केला पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:28 AM
वाड्याच्या भिंतीवरु न घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील हिवरा (बु ) येथे शनिवारी घडली आहे.
ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यातील हिवरा (बु) येथील घटना