लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता नारायणकर तर उपनगराध्यक्षपदी सय्यद जरीना यांची बिनविरोध निवड झाली. येथील पंचायत समिती सभापती महिला असल्यामुळे खऱ्या अर्थाने पाटोद्यात महिलाराज अवतरले आहे.
दोन्ही पदाधिकारी माजी मंत्री सुरेश धस यांच्या कट्टर समर्थक आहेत. नगरपंचायतीच्या पंचवार्षिक कालावधीच्या पहिल्या सत्रातील अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. द्वितीय सत्रासाठी अध्यक्षपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव सुटले. अनिता नारायणकर या एकमेव सदस्या या प्रवर्गामधून असल्याने त्यांची निवड निश्चित होती.
उपाध्यक्षपदी कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केली होती. मात्र निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी सय्यद जरीना यांचे नाव आष्टी येथून कळवण्यात आले. त्यानुसार त्यांची निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश निºहाळी यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी त्यांना मदत केली.