बीड : बीड नगर पालिकेतील विषय समित्यांच्या निवडी शुक्रवारी बिनविरोध पार पडल्या. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या शहर विकास आघाडीचे सर्वच सभापती नियूक्त करण्यात आले. निवडीच्यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बीड नगर पालिकेत ५० नगरसेवक व ५ स्विकृत सदस्य आहेत. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची शहर विकास आघाडी आ.संदीप क्षीरसागर यांची काकू नाना विकास आघाडी आणि एमआयएम अशी लढत झाली होती. यात शहर विकासचे १९, काकू नानाचे १० व एमआयएमचे ७ सदस्य आहेत. शुक्रवारी विषय समित्यांच्या निवडी करण्यात आल्या. प्रत्येक समितीत १२ सदस्य आहेत. यात ५ काकू नाना, ५ शहर विकास आणि २ एमआयएमच्या सदस्यांना सहभागी करून घेण्यात आले. परंतु सभापती हा शहर विकासचा निवडण्यात आला. स्वच्छता व आरोग्य सभापती हे पदसिद्ध असल्याने उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्याकडे राहिले. तर बांधकाम विनोद मुळूक, पाणी पुरवठा सय्यद इलियास हमीद यांच्याकडे गेले.
दरम्यान, या निवडीवेळी पिठासिन अधिकारी म्हणून नामदेव टिळेकर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, विभाग प्रमुख प्रियंका दामधर, भगवान कदम यांनी त्यांना सहकार्य केले.
असे आहेत नवे सभापती
बाधंकाम - विनोद मुळूक
शिक्षण व क्रीडा - भास्कर जाधव
नियोजन व विकास - सुशिला नाईकवाडे
पाणीपुरवठा - सय्यद इलियास हमीद
महिला व बालकल्याण - अश्विनी गुंजाळ
स्वच्छता - उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर
विद्यूत - सुभद्रा पिंगळे
स्थायी समिती सदस्य - विकास जोगदंड, शेख मोहंमद खालेद, फारूख पटेल