धारूर : धारूर शहर व परिसरात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांना फेकून देण्याची पाळी आली. बाजार ही पूर्णपणे विस्कटला होता या पावसामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला आहे.
धारूर तालुक्यात व शहरांमध्ये गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे आहे. शुक्रवारी दुपारी अचानकच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ज्वारी, हरभरा, गहू या पिकाचे व भाजीपाल्याचे अंबा, द्राक्षे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरआठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांना ही जागेवर भाजीपाला टाकून या ठिकाणी निघून जाण्याची पाळी आली. हजारो रुपयाचा भाजीपाला ही वाया गेला. नागरिकांची ही ञेधा तिरपट उडाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.