उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 09:51 PM2024-09-30T21:51:04+5:302024-09-30T21:51:12+5:30

काय कारवाई होणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

use of Stolen electricity for Deputy Chief Minister Ajit Pawar's program | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर

माजलगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 'जनसन्मान' यात्रा मंगळवारी शहरात येणार असून, त्यासाठी कार्यक्रमस्थळी चोरून विज घेण्यात आल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला परवानगी न घेताच वीज वापर होत असल्यामुळे यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

मागील अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जल सन्मान यात्रा महाराष्ट्रभर फिरून मंगळवारी याचा परळी येथे समारोप होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता मंगलनाथ मैदानामध्ये या यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभास्थळी मागील चार दिवसांपासून भव्य अशा मंडपाची उभारणीचे काम सुरू आहे. तेव्हापासून जवळच असलेल्या एका रोहीञावरून डायरेक्ट आकडे टाकून विजेचा वापर सुरू आहे. यासाठी संबंधित मंडप उभारणी वाल्यांनी वीज वितरण कंपनीकडून यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सोमवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आकडे तसेच दिसून येत होते. तीन दिवसांपूर्वी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता आम्ही जनरेटर लावून असल्याचे सांगितले होते. परंतु 3-4 दिवसांपासून या ठिकाणी आकडे टाकून विच चोरी करण्यात येत आहे. असा प्रकार कोणी सर्वसामान्यांनी केला असता तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली असती. परंतु हा प्रकार वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना माहीत असताना देखील त्यांनी अद्याप कारवाई केली नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची वीज चोरीसाठी मुख संमती तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. 

मुख्य रस्त्यावर विनापरवाना होर्डींग्ज 

या जनसन्मान यात्रेसाठी शहरात जागोजागी होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण पाहावयास मिळत होते. न्यायालयाने कोठेही होर्डींग्ज लावण्यास मनाई केलेली असताना व नगरपालिकेची कसल्याच प्रकारची परवानगी न घेता हे होर्डींग्ज लावले असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला  परवानगीची आवश्यकता नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. 

शहरात होणारे जनसन्मान यात्रेसाठी वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या मीटर साठी परवानगी घेण्यात आलेली नाही. दोन दिवसापूर्वी आम्ही जाऊन पाहणी केली असता डीपी वरून फक्त फोकस साठी लाईट घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी जनरेटर चा वापर करणार असल्याचे या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. कल्पना सांगोलकर , कनिष्ठ अभियंता, विज वितरण कंपनी माजलगाव शहर

Web Title: use of Stolen electricity for Deputy Chief Minister Ajit Pawar's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.