भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांच्या मनात लसीकरणाविषयी असलेली भीती दूर करून त्यांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे. याविषयी जाणीव-जागृती सुरू आहे. बीड तालुक्यातील नेकनूर, मांजरसुंबा, लिंबागणेश पालवण, पिंपळवाडी तसेच अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी, धायगुडा पिंपळा, पूस तळणी, घाटनांदूर इत्यादी गावांमध्ये जाऊन लसीकरणासंबंधी ऑडिओ क्लिप लोकांना ऐकवण्यात आली. सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष भेटून, जन शिक्षण संस्थांच्या कार्यकर्त्यांनी माहिती सांगितली. त्यांच्या प्रश्नांचे शंकानिरसन केले, तसेच गरजू लोकांना कापडी मास्कचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण नागरिकांच्या मनात अनेक समस्या व भीती असल्याचे लक्षात आले. बऱ्याच लोकांनी न घाबरता लस घेतल्याचेही सांगितले. लस कोठे मिळते, लसीकरण नोंद कशी करावी याची माहिती नसल्याने बरेच लोक लसीकरणापासून दूर आहेत. आपल्याच गावात लसीकरण व्यवस्था झाली तर अधिक सोपे होईल, दिव्यांग लोकांना लसीकरण केंद्रावर कसे घेऊन जायचे अशा अनेक समस्या ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या. एकंदरीत ग्रामीण भागात लसीकरणाविषयी योग्य माहिती देण्याची गरज असल्याचे लक्षात आले.
जनशिक्षण संस्थानच्या या अभियानाविषयी ग्रामस्थांकडून खूप समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. ह्या अभियानात संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुदाम पालकर, धर्मराज जाडकर, अमोल पिंगळे यांचा सहभाग होता.
===Photopath===
280621\28bed_1_28062021_14.jpg
===Caption===
लसीकरण जाणीव जागृती अभियान