सध्या परळी शहरात केवळ उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे; परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे लसीकरण केंद्रे वाढवणे गरजेचे होते. आणि उपजिल्हा रुग्णालयात हे केंद्र दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून जाणे अवघड झाले होते. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. ही बाब न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या निदर्शनास आणून दिली. कराड यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांना सांगून प्रभाग क्रमांक पाचमधील खंडोबा मंदिराशेजारी असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. यामुळे जुन्या परळी गावभागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केलेली मागणी तात्काळ मार्गी लावल्याबद्दल न.प. गटनेते वाल्मीक कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे यांचे आभार मानले.