गेवराई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी हे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व शाळा, महाविद्यालयात लसीकरण सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापूर्वी कडक लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजार, व्यापारी पेठा, शाळा, महाविद्यालय, बससह सर्व काही बंद ठेवले होते. मात्र आता सर्व व्यापारी पेठा, बाजार, बससह सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. मात्र यात अजूनपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी हे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात निर्णय घेऊन शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर पहिलीपासून ते दहावी, बारावीसह सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लसीकरण सुरू करावे, अशी मागणी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांनी केली आहे.