लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : निसर्गाची अवकृपा आणि इतर अनेक संकटे आली तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांसाठी न्याय भूमिका घेतली आहे. आता दुष्काळाचे संकट आपल्यासमोर उभा आहे. अशा परिस्थितीतही वैद्यनाथ सभासद शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास देत खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी वैद्यनाथला जास्तीत जास्त ऊस गाळपास आणावा, असे आवाहन केले.वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या १९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी खा.डॉ.प्रीतम मुंडे व पन्नंगेश्वर शुगरच्या चेअरमन प्रज्ञा मुंडे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आ.आर.टी. देशमुख, आ.संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, पन्नंगेश्वर शुगर मिलचे उपाध्यक्ष किसनराव भंडारे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया उपस्थित होते.पुढे बोलताना खा.डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, जिल्ह्यात दुष्काळ आहे. पाच वर्षापासून कुठल्या ना कुठल्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. संकटकाळात नेहमीच मुंडे साहेब आपल्या पाठीशी असायचे, त्याप्रमाणे आता त्यांच्या पश्चात पालकमंत्री पंकजा मुंडे या देखील आपल्यामागे उभ्या आहेत. आपल्या कारखान्याचे काम अत्यंत चागले आहे. अनेक विक्र म आपण केले आहेत. मुंडे साहेबांनी लावलेले हे रोपटे आपल्याला जपायचे आहे. शेतकºयांचे, गोरगरीब, वंचितांचे हित जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे साहेबांच्या पाठीशी असणारी आपली साथ आणि आशीर्वाद जसे दिले तीच गरज आम्हाला असल्याचे त्या म्हणाल्या.कार्यक्र माला जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, कारखान्याचे संचालक पांडुरंग फड, ज्ञानोबा मुंडे, भाऊसाहेब घोडके, माधवराव मुंडे, त्रिंबकराव तांबडे, किसनराव शिनगारे, आश्रुबा काळे, व्यंकट कराड, दत्तात्रय देशमुख, परमेश्वर फड, गणपत बनसोडे, केशव माळी, शामराव आपेट, जमुना लाहोटी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, मुकादम व नागरिक उपस्थित होते.प्रारंभी कारखाना उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांनी कारखान्याची माहिती दिली तर प्रास्ताविक कार्यकारी संचालक जी.पी.एस.के. दिक्षीतुलू यांनी केले. संचालन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले तर शिवाजीराव गुट्टे यांनी आभार मानले.
‘वैद्यनाथ’ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी-मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:34 AM
निसर्गाची अवकृपा आणि इतर अनेक संकटे आली तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांसाठी न्याय भूमिका घेतली आहे. आता दुष्काळाचे संकट आपल्यासमोर उभा आहे. अशा परिस्थितीतही वैद्यनाथ सभासद शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास देत खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी वैद्यनाथला जास्तीत जास्त ऊस गाळपास आणावा, असे आवाहन केले.
ठळक मुद्देदुष्काळाच्या संकटात खंबीर साथ देण्याचे अभिवचन : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या १९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ