शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

प्रवास्यांच्या प्रतीक्षेतील सुसज्ज कडा रेल्वेस्थानकाची तोडफोड; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 9:39 AM

रेल्वे अधिकाऱ्यांकडून ना दाद ना फिर्याद, स्थानकांची तोडफोड होऊनही दुर्लक्ष

- नितीन कांबळे कडा ( बीड) -  नगर ते आष्टी रेल्वेमार्ग पूर्ण झाला असून ठिकठिकाणी सुसज्ज रेल्वेस्थानके उभारले आहेत. मात्र, या मार्गावर अद्याप रेल्वे धावली नाही. यामुळे येथील रेल्वे स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. कडा येथील रेल्वेस्थानकाची काही माथेफिरुंनी तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत कुठेही फिर्याद देण्यात आली नाही की दाद मागितली नसल्याने अशा घटना वाढण्याची शक्यता आहे.

नगर ते बीड, परळी रेल्वे मार्ग बहुचर्चित आहे. हा रेल्वे मार्ग आष्टी तालुक्यातुन गेला आहे. नगर ते आष्टी मार्ग पूर्ण झाला असून हायस्पीड रेल्वे चाचणी देखील झाली आहे. मात्र, रेल्वे मंत्रांच्या घोषणेनंतर ही अद्याप रेल्वे धावली नाही. दरम्यान, नगर ते आष्टी पर्यंत ठिकठिकाणी सुसज्ज रेल्वे स्थानक उभारलेली आहेत. पण अनेक महिन्यांपासून रेल्वे न धावल्याने ही स्थानके बेवारस पडली आहेत. यातूनच काही माथेफिरुंनी कडा येथील रेल्वे स्थानकांच्या खिडक्या, दरवाजे तोडल्याचे निदर्शनास आले आहे.

स्थानकात काचांचा खच आढळून आला आहे. समोरील गेटचे कुलूप तोडून टाकले आहे. मोठ्या प्रमाणावर तोडफोड होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांकडून याची कसलीच फिर्याद पोलिस ठाण्यात देण्यात आली नाही. यामुळे आता असे प्रकार पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानकाची पाहणी करावी, कायम सुरक्षा रक्षक ठेवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वे