निसर्गाने साथ दिल्याने तालुक्यातील नागापुर येथील वाण प्रकल्पात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असून आसपासच्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी वाण प्रकल्पाचे पाणी वाण नदीपात्रात सोडावे या मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने कराड यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले होते.
नागापूर, लिंबोटा, नाथ्रा, बहादुरवाडी, पांगरी, दे.टाकळी, सबदराबाद, तडोळी, वडखेल आणि तळेगाव शिवारात सध्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची येथे टंचाई असून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे विहिरी आटल्या आहेत. मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे कराड यांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, १७ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. ते प्राप्त होताच कराड यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्याशी संपर्क केला. कनिष्ठ अभियंता कुरेशी यांच्यासमवेत प्रकल्पावर जाऊन शेतकऱ्यांच्या उपस्थित व्हॉल्व्ह फिरवून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यावेळी कराड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, राऊत, कार्यकारी अभियंता सलगर कर, कनिष्ठ अभियंता कुरेशी व परिसरातील सरपंच, चेअरमन व शेतकऱ्यांचे आभार मानले.
वाण धरणातून पाणी सोडताना फुलचंद कराड, क. अभियंता कुरेशी, मंचक मुंडे, प्रशांत कराड, श्रीकृष्ण मुंडे, माधव मुंडे, शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
170521\img-20210517-wa0464_14.jpg