राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने सायकल स्पर्धा घेण्यात आली. तसेच यावेळी मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच परिसर स्वच्छतेचे आयोजनही करण्यात आले होते. महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने कोरोनावर सामाजिक जनजागृती अंतर्गत पथनाटय सादर करण्यात आले. रांगोळी स्पर्धेसोबतच आजचा मानव व पर्यावरण, कोविड १९ चा पर्यावरणावर झालेला प्रभाव या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. निसर्ग व पर्यावरण याविषयावर चित्रकला स्पर्धा झाली. वाक्प्रचार,म्हणी सुविचार स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. टग ऑफ वॉरच्या वतीने रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.एस.हंगे,उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा.जालींदर कोळेकर,डॉ.अनिता शिंदे,डॉ.खाकरे,डॉ.नेटके, डॉ.खान,एनसीसी विभाग प्रमुख डॉ.पोटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.