लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका बांधकाम मजुरांना बसल्याने बांधकाम मजुरांना २५ हजार रुपयाची मदत करावी, हाताला काम द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता केज तहसील कार्यालयावर वाजतगाजत मोर्चा काढला या मोर्चात केज शहरासह तालुक्यातील बांधकाम मजूर सहभागी झाले होते.तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका बांधकाम मजुरासह वीटभट्टी कामगारांना बसला आहे. तालुक्यात पाणीटंचाईमुळे अनेकांनी आपले बांधकाम बंद केल्याने बांधकाम मजुरासह वीटभट्टी कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी बांधकाम मजुरासह वीटभट्टी कामगारांनी मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार आशा वाघ यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले.यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा मजुरांनी दिला. या मोर्चात रमेश कदम, राजेभाऊ डुकरे, चंद्रकांत गुंड, भाई अशोक रोडे, सचिन कोरडे ,निसार सय्यद, मोहन मस्के, रसूल शेख, दीपक मस्के, चंद्रकांत मस्के, अशोक गाढवे, सदाशिव कसबे, चंद्रकांत मुळे, बबन सातपुतेसह मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चेकऱ्यांच्या विविध मागण्या४शासनाने पंचवीस हजार रु पयांची मदत करावी, ५५ वर्षाच्या बांधकाम मजुरास पेन्शन योजना लागू करावी, बांधकाम मजुरांच्या मुला-मुलींना शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यात यावे,४बांधकाम मजुरांना अत्यल्प दरात स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, बांधकाम मजुरांच्या हाताची ठसे कामामुळे बायोमॅट्रिकवर उमटत नसल्याने त्यांना यात सवलत देण्यात यावी, त्यांना घरकुल देण्यात यावेत,४बांधकाम मजुरांच्या हाताला काम देण्यात यावे आदी मागण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा मंगळवार पेठ मार्गे तहसील कार्यालयावर धडकला.
केजमध्ये बांधकाम मजुरांचा विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:23 AM