लोकमत न्यूृज नेटवर्क
बीड : दोन पिकअप आणि एक आयशर टेम्पोमधून कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणार्या वाहनांवर पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांच्या विशेष पथकाने कारवाई केली. यावेळी टेम्पोतील गायी व वासरांची सुटका केली असून, १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या दरम्यान करण्यात आली.
विशेष पथकातील प्रमुख विलास हजारे यांना गायी कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे त्यांनी मांजरसुंबा चौकात सापळा रचला. सोमवारी पहाटे खडकत (ता.आष्टी) येथून गायी व वासरे बीडमधील कत्तलखान्यात दोन पिकअप व आयशर टेम्पोमधून घेऊन नऊ जण येत होते. यावेळी वाहने ताब्यात घेत त्यामधून गायी, वासरे, बैल असे एकूण ४९ जनावरांची सुटका करण्यात आली. यावेळी वाहनांसह सर्व मिळून १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात जुबेर कट्टूभाई पठाण (रा.मोमीनपुरा, बीड), सय्यद खलीद शौकत (मोहमदिया कॉलनी, बीड), सय्यद शमशोद्दीन सय्यद बसरोद्दीन (मानसूम कॉलनी, बीड), मोसीन हसन कुरेशी, आसद जफर कुरेशी, नसीर बीबीनजी कुरेशी, मोहमद इब्राहीम कुरेशी, मोमीन मज्जीद कुरेशी, कादीरमीया अहमदमीया कुरेशी या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.
===Photopath===
070621\07_2_bed_21_07062021_14.jpeg
===Caption===
गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गंत कारवाई केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.