लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गेवराईकडे दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकीला जोराची धडक दिली. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पिता गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पाढंरवाडी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी घडली.दरम्यान, प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. बंदी असतानाही सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.निकिता (१६ रा.कोमलवाडी ता.गेवराई) असे मयत मुलीचे नाव असून रामदास जाधव असे तिच्या जखमी पित्याचे नाव आहे. निकिता ही पित्यासोबत गुरुवारी सकाळी गावाकडून गेवराईकडे येत होते.ते पाढंरवाडी फाट्याजवळ आले असता त्याच वेळी अवैध वाळूने भरून भरधाव येणाºया विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जाधव यांच्या दुचाकीला पाठिमागून जोराची धडक दिली. यावेळी निकिता उडून ट्रॅक्टरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर रामदास जाधव हे गंभीर जखमी झाले. यावरही ट्रॅक्टर न थांबल्याने ते बाजुलाच असलेल्या गॅरेजमध्ये शिरले. सुदैवाने येथे कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रॅक्टर थांबताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर गेवराई पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झालेली नव्हती.दरम्यान, वाळू माफियांवर कारवायांसाठी प्रशासन आता कडक पाऊले उचलणार की आणखी बळी जाण्याची वाट पाहणार हे येणारी वेळच ठरवेल.गोदापात्रातून अवैध वाळू उपसासध्या गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाळू वाहतूक करणारे टॅक्टर शहरात राजरोजपणे दिवसरात्र भरधाव वेगाने धावताना दिसतात. कारवाईच्या भितीपोटी धावणाºया अशा वाहनांमुळेच निकितासारख्या निष्पाप मुलींचा बळी जात आहे. ही वाहतूक बंद असती तर हा अपघात टळला असता, अशी चर्चा शहरात सुरू होती. ही वाहतूक बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सुनिल ठोसर यांनी केली आहे.
गेवराईत अवैध वाळू वाहतुकीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:19 AM
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गेवराईकडे दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकीला जोराची धडक दिली. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पिता गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पाढंरवाडी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी घडली. दरम्यान, प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. बंदी असतानाही सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष भोवले : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीवरील मुलीला चिरडले