बीड : ‘‘मुझे मिलने के लिए बहोत लोग आये. किसीने आधार दिया, तो किसीने मेरी भावनाओं को ठेस पहुंचाने की कोशिश की. किसीने मुझे पैसे देने की बात कही. लेकिन मुझे पैसा नहीं, न्याय चाहिए न्याय,’’ असा आर्त टाहो फोडीत अत्याचारपीडित मुलीने आपली व्यथा मांडली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. भीक मागून शिक्षण पूर्ण करणा-या गुणवंत विद्यार्थिनीला नराधमाच्या वासनेची शिकार व्हावे लागले.
बीड शहरात अंध आईसोबत राहून तिची काठी बनून आधार देत भीक मागून कुटुंबाचा गाडा चालविणाºया सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेख जावेद शेख सलीम या नराधमाने परिस्थितीचा फायदा घेऊन वारंवार अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. ही घटना समोर आल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला बेड्याही ठोकल्या. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडितेसह तिच्या आईची भेट घेतली. कुणी आधार दिला, तर कुणी पैसे देण्याचे आमिष दाखविले; परंतु आपल्याला हे काहीही नको, मला न्याय हवाय, अशा परखड शब्दांत पीडितेने अश्रूपूर्ण डोळ्यांनी आपली व्यथा मांडली. आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे हे तिच्या मदतीसाठी धावून जात आहेत.मुझे दसवीं पास होना हैं...पीडिता सध्या नववीच्या वर्गात असून, ती उत्कृष्ट हॉकीपटूही आहे. परिस्थितीमुळे तिला पुढे जाता आले नाही. असे असूनही तिने हार मानली नाही. आपल्यावर अत्याचार झाला असला तरी प्रसुतीनंतर आपण पुन्हा शाळेत जाऊन दहावी पास होण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या बोलण्यात प्रखर आत्मविश्वास जाणवत होता.
दिवसभर शाळा; रात्री भीकवडिलांचे लहानपणीच छत्र हरपले. आईही अंध. शिक्षण घेण्याची इच्छा; परंतु परिस्थिती आडवी आली. परिस्थितीवर मात करीत पीडिता दिवसभर शाळेत जाऊन शिक्षण घ्यायची. शाळा सुटल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत आईच्या मदतीने, तर कधी एकटी भीक मागायची. याच पैशातून शिक्षण व उदरनिर्वाहाचा खर्च भागविला जायचा.