शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:53 PM

अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

ठळक मुद्देखरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा विक्रेता कार्यशाळा : नियमबाह्य बाबींची जबाबदारी राहणार कृषी अधिका-यांची

बीड : शेतकरी हा जिल्ह्यातील विकासाचा केंद्रबिंदू आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी निविष्ठा विकणारे विक्रेते यांच्या तो सतत संपर्कात असतो. त्याला योग्य मार्गदर्शन केले तर फायदा होऊ शकतो, परंतु स्वत:च्या फायद्यासाठी अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व कृषी सेवा केंद्र बियाणे व खातांचे मुख्य विक्रेत्यांची कार्यशाळा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयत संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र निकम, संगीता पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक बी.एम. गायकवाड, कागदे, कृषी निविष्ठा विक्रेता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, जिल्हाध्यक्ष सत्यनारायण कासट यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी जिल्हा पातळीवर खरीप हंगामपूर्व तयारीबाबत कृषी विभाग करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच कृषी निविष्ठा विक्रेता यांच्यामार्फत शेतकºयांना आवश्यक माहिती पोहोचावी, यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन दिले असे निकम म्हणाले. कार्यशाळेसाठी कृषी निविष्ठा विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, कृषी व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कृषी सेवा केंद्र चालकांना आवाहनबोंडअळी निर्मुलनासाठी चोरबीटीची विक्री कृषी सेवा केंद्र चालकांनी करु नये. तसेच प्रशासनाने बंदी घातलेले खते, बियाणे विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुका स्तरावर पथके नेमून तपासणी करण्यात येत असून, खते-बियाणे संदर्भात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरीय पथके नेमण्याचे आदेशजिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले,कृषी क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत, अशावेळी विक्रेत्यांनी दर्जेदार कृषी साहित्य विकावे.पाऊस पाणी, वातावरण ,नैसर्गिक आपत्ती यांच्याशी संघर्ष करून हा भूमिपुत्र अन्नधान्य पिकवत असतो. त्याच्याशी संवेदनशीलपणे वागणूक देऊन काम करावे.मिश्र खतांचे नियमबाह्य उत्पादन व विक्रीवर बंधने असून अशा घटनांमध्ये दोषी आढळणाºयांवर कारवाई केली जाईल असे पाण्डेय म्हणाले.रासायनिक खते व औषधे मानवी जिवनासाठी घातक असल्याने याबाबत शेतकºयांना माहिती देऊन जनाजागृती करावी.खते व कृषी निविष्ठांची विक्री करताना विविध खतांबरोबरच सेंद्रिय खते, बायोकंपोस्ट याचा वापर व माहिती देण्याकडे कल असावा.वजन, दर, दर्जा राखला जावा. फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा स्तरावरून पथके नेमावीत तसेच वजनाबद्दल तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र