शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पीडिता नातेवाईक फितूर, न्यायवैद्यक पुराव्यावरून अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

By संजय तिपाले | Published: September 29, 2022 5:37 PM

अत्याचार केल्यानंतर आरोपीने पिडीतेचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले

बीड: अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करुन नंतर तिचे अश्लील फोटो व्हॉटस्अप स्टेटसला ठेऊन बदनामी करणाऱ्रूा तरुणास येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी दहा वर्षांची सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दोन वर्षांपूर्वी नेकनूर ठाणे हद्दीतील घटनेत २९ सप्टेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. विशाल शरद शेळके (वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी व आरोपी एकाच गावचे रहिवासी असून नातेवाईक आहेत.

१९ ऑक्टोबर २०२० रोजी पीडित मुलगी शेतातील ओढ्यातून घराकडे येत होती. यावेळी विशाल  शेळके याने तिला वाटेत अडवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिचे अश्लील फोटो काढून त्याने तिला चापटाबुक्क्याने मारहाण करुन उद्या याच ठिकाणी भेटायला ये म्हणून सांगितले. पीडिता भेटायल न गेल्यावर त्याने तिचे अश्लील फोटो व्हॉटस्अप स्टेटसला ठेऊन तिची बदनामी केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पीडितेने त्याच्याविरुध्द नेकनूर ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पो.नि.प्रदीप त्रिभुवन यांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

पीडिता फितूर, न्यायवैद्यक चाचणी अहवाल महत्त्वाचासरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. मात्र, पीडितेसह तिचे नातेवाईक फितूर झाले. मात्र, न्यायवैद्यक चाचणी अहवालातून अश्लील फोटो आरोपीने स्वत:च्या मोबाइलने काढल्याचे सिध्द झाले तसेच ते फोटो त्याच्याच मोबाइलमधून हस्तगत केले. हे फोटो पीडितेचे असल्याने एका साक्षीदाराने आळखले. त्यावरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी