- नितीन कांबळेकडा- आष्टी तालुक्यात बिबट्याचे दर्शन कुठे ना कुठे होत आहे. तर काही ठिकाणी शेळ्याचा देखील फडशा पाडल्याच्या घटना पुढे आलेल्या असताना आता आष्टी,पाटोदा तालुक्याच्या सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे. नुकताच सौताडा येथील एका रस्त्यावर बिबट्याने दर्शन झाले. यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे झाडाझुडपातून जाणाऱ्या एका रस्त्यावर गुरूवारी सायंकाळच्या दरम्यान एक बिबट्या मुक्त संचार करत होता. यावेळी तेथून जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने शूट केलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आष्टी तालुक्यात आठवडय़ात कूठे ना कुठे बिबट्या दिसत आहे.तर काही ठिकाणी बिबट्याने शेळ्याचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. आष्टी आणि पाटोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर असल्याने येथे बिबट्याचे वास्तव होत असल्याचे वनविभागाकडून बोलले जात आहे.
शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी दरम्यान,मागील अनेक महिन्यांपासून शेळ्याचा फडशा बिबट्याने पाडला आहे.मात्र, मानवी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या नाहीत. परंतु या परिसरात बिबट्या अचानक कुठेही नजरेस पडू शकतो. हे सौताडा येथील घटनेवरून दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.