अंबाजोगाई-: "रक्ताची नाती दृष्टीआड लोपली, सांभाळा जनहो कुटुंबे आपली" असा संदेश संगीत शिक्षक प्रकाश बोरगावकर यांनी आपल्या गीतातून दिला आहे. त्यांचे हे कोरोना जनजागृती वरील गीत अंबाजोगाई व परिसरात चांगलेच गाजु लागले आहे.
अंबाजोगाई येथील गुरुदेव विद्यालयात तालमार्तंड प्रकाश बोरगावकर हे संगीत शिक्षक आहेत.आठवडा भरा पूर्वीच ते कोरोनाच्या व्याधीतून बाहेर आले.अंबाजोगाई व परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी प्रसासन मोठया प्रमाणात जनजागृती करत आहे.तरीही नागरिक रस्त्यावरील गर्दी कमी करत नाहीत.परिणामी संसर्ग वाढतच आहे.यातुन अनेक कुटुंबांची मोठी हानी होत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी संगीत शिक्षक असलेल्या प्रकाश बोरगावकर यांनी पुढाकार घेतला.
जे कोरोनाचे अनुभव स्वतः सह इतरांना आले.ते कोणाच्या वाट्याला येऊ नयेत.यासाठी गीता च्या माध्यमातून त्यांनी जागृती सुरू केली आहे. त्यांचे हे कोरोनावरील गीत अंबाजोगाई तालुक्यात व परिसरात चांगलेच गाजु लागले आहे. त्याच्या या गीताची चित्रफीत सर्वत्र पसरली आहे.