शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दिग्गजांच्या पदरी निराशा; पंकजा मुंडे, विनायक मेटे यांना डावलले, अमरसिंह पंडितांचीही निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 3:46 PM

एकंदरीत विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांनी बीड जिल्ह्याला डावलले आहे.

- अनिल लगडबीड :विधान परिषदेची उमेदवारी नाकारून राज्याच्या माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आहे तर भाजप समर्थक शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचाही पत्ता भाजपने कट केला आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचीही निराशा झाली आहे. एकंदरीत विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांनी बीड जिल्ह्याला डावलले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी दुपारी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. यावेळी भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी शक्यता होती. तशी चर्चा देखील होती. परंतु याहीवेळी मुंडे यांना डावलले. हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजप समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

बीडमधून २०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंडे यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. याआधीही राज्यसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यावेळी त्यांना संधी देण्यात आली नाही. परळीत गोपीनाथ गडावर ३ मे रोजी भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या संघर्ष दिन कार्यक्रमात मुंडे या आक्रमकपणे सहभागी झालेल्या दिसल्या. मात्र मुंबईतील ओबीसी मोर्चा व औरंगाबादेतील जल आक्रोश मोर्चाला त्यांची गैरहजेरी ठळकपणे दिसून आली. या उलट त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिवपद दिल्याने राष्ट्रीय राजकारणात त्या सक्रिय दिसत होत्या. यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन दिले होते. तरीही त्यांना उमेदवारी नाकारली. यामुळे सध्या तरी त्यांना भाजपसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करावे लागणार आहे, असेच चित्र आहे.

काँग्रेसकडून बीडला खासदारकीकाँग्रेस नेत्या रजनी पाटील यांना काँग्रेस पक्षाने पाच महिन्यापूर्वी राज्यसभेची खासदारकी दिली आहे. लोकसभेच्या माध्यमातून भाजपच्या खा. प्रीतम मुंडे तर काँग्रेसकडून राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील या बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना खासदारकी बहाल केली आहे.

विनायक मेटेंचा पत्ता कटदरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचीही विधान परिषदेवरील मुदत संपली होती. मागील वेळी त्यांंना भाजपनेच विधान परिषदेवर संधी दिली होती. यामुळे त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता होती. त्यांनीही तशी मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यांचाही भाजपने पत्ता कट केला आहे. यामुळे मेटे समर्थकांतही भाजपविषयी नाराजीचा सूर आहे.

राष्ट्रवादीकडूनही निराशाराष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेत दोन जागा आहेत. गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पुनर्वसन होईल, अशी शक्यता होती. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी मागणीही समर्थकांनी केली होती. परंतु त्यांचाही राष्ट्रवादीकडून अपेक्षाभंग झाला आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAmarsingh Punditअमरसिंह पंडितVinayak Meteविनायक मेटेBeedबीडVidhan Parishadविधान परिषद