बीड : तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी एस.एन. मुसळे यांनी पदभार स्वीकारला. याबद्दल उपसरपंच राजेश गवळी, रामेश्वर जाधव, अरुण पेंढारे, स्वप्नील सिरसट यांनी त्यांचा सत्कार केला.
ओपन जीमचे साहित्य पडले धूळ खात
बीड : जिल्हा क्रीडा संकुल परिसरात गेल्या काही दिवसांपासून ओपन जीमचे साहित्य धूळ खात पडले आहे. लाखो रुपये खर्चून आणलेले हे साहित्य उभारलेले नाही. याकडे लक्ष देऊन साहित्य उपयोगात आणावे, अशी मागणी आहे.
श्रीहरी मोरे यांचा निवडीबद्दल सत्कार
बीड : बहुजन विकास मोर्चाचे श्रीहरी मोरे यांची पंचायतस्तरीय रोहयो समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रविकिरण शिंदे, अविनाश सोनवणे, जगदीश शिंदे, वैभव कांबळे, अरुण सवणे, अमन गरुड आदी उपस्थित होते.
वर्दळीच्या रस्त्यावर आडवीतिडवी वाहने
बीड : शहरातील सुभाष रोड, डीपी रोड, कारंजा, बशीरगंज, भाजी मंडई भागामध्ये दिवसभर वर्दळ असते. वाहतुकीचे प्रमाणही या रस्त्यावर जास्त आहे. मात्र, या भागामध्ये वाहनचालक शिस्त न बाळगता वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
राजर्षी शाहू अध्यापक महाविद्यालयात जयंती
अंबाजोगाई : येथील राजर्षी शाहू अध्यापक महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. विश्वनाथ चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डाॅ. प्रवीण पाथरकर, प्रा. मस्क, प्रा. काटकर, प्रा. भगत, प्रा. साळवे, प्रा. कराड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.