शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

तीन दिवसांपासून गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ञाला कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 5:38 PM

अवाकाळी पावसामुळे केजसह ग्रामीण भागातील वीज बंद आहे

- मधुकर सिरसटकेज (बीड): तालुक्यातील तांबवा गावातील वीज तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. विद्युत मोटारी, गिरणी बंद असल्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. मागणी करूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने आज सकाळी ग्रामस्थांनी शाखा अभियंता साळकराम अंडील व तंत्रज्ञ सतीश तांदळे यांना महावितरणच्या कार्यालयात कोंडले. 

अवाकाळी पावसामुळे केजसह ग्रामीण भागातील वीज बंद असल्याने शाखा अभियंता साळीकराम अंडील हे तंत्रज्ञ सतीश तांदळे, लाईनमन मसुरे, गवळी, ढाकणे यांच्यासह सुटी असतानाही कार्यालयात काम करत होते. दरम्यान, आज सकाळी मीरा आंधळे, संगीता ओव्हाळ, कैकई ओव्हाळ, संजीवनी चाटे, बारीकबाई चाटे, कविता ओव्हाळ, अनिता ओव्हाळ, ताईबाई पवार, प्रयागाबाई पवार, मीरा ओव्हाळ, मंगल लांडगे, लंकाबाई चाटे, रुक्मिणी परळकर आदी महिलांसह रामधन चाटे, अरुण चाटे, ज्ञानेश्वर कराड, विनोद चाटे, गणेश कांदे, गोविंद नागरगोजे, विष्णू चाटे, शिवकुमार चाटे, सचिन चाटे, गणेश चाटे यांनी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.  जोरदार घोषणाबाजी करत शाखा अभियंता साळीकराम अंडील व तंत्रज्ञ सतीश तांदळे यांना ग्रामस्थांनी कार्यालयात कोंडले. 

दरम्यान, अभियंता अंडील यांनी उपकार्यकारी अभियंता नामदेव सुतार यांच्या कानावर हा प्रकार घातला. यावेळी संतप्त महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी पीठ नाही. सांगा आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न यावेळी महिला आंदोलकांनी उपस्थितीत केला. एक तासानंतर आंदोलकांनी दरवाजा उघडून चर्चा केली. लवकरच गावातील वीज पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

वीज पडल्यामुळे तांत्रिक अडचणयाप्रकरणी शाखा अभियंता साळीकराम अंडील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी केज येथील महावितरणच्या रोहित्रावर वीज पडल्यामुळे विजपुरवठा पूर्णतःह खंडित झाला होता. शुक्रवारी सुट्टी असतानाही 8 रिले आणि शिट्टी उपलब्ध करून जोडण्यात आले होते. परंतु तरीही वीज सुरुळीत झाली नव्हती. आंदोलन केल्यामुळे वरिष्ठाच्या परवानगीने सध्या बायपास करून थेट जोडणी करून वीज पुरवठा सुरुळीत करण्यात आल आहे. 

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण