बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या आटोक्यात येत नाही. ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या, अंगावर दुखणे काढण्याचे प्रमाण लक्षात घेता बीड पंचायत समितीचे सभापती बळीराम गवते यांनी रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णांना बीडमध्ये मदत करतानाच, त्यांनी आता ग्रामीण भागातील प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना तपासणीसाठी जनजागृती करण्याबरोबरच त्यांनी आता ‘जिथे गरज तिथे अँटिजन तपासणी कॅम्प’ सुरू केला आहे. याची सुरुवात तालुक्यातील बेलुरा येथे १८ मे पासून करण्यात आली. यावेळी ६० लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली.
बीड जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन प्रयत्न करत आहेत. अशावेळी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या बीड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड पंचायत समितीचे सभापती बळीराम गवते यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त असून, लोक अंगावर दुखणं काढत आहेत. परंतु परिस्थिती गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची परिस्थिती बिकट होत आहे. तेव्हा नागरिकांनी या आजाराला न घाबरता लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करावी. यासाठी बळीराम गवते यांच्याकडून जनजागृती केली जात आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, जेवढे लवकर निदान, तेवढे लवकर उपचार अन लवकर आजारातून मुक्ती मिळवण्याचा सल्लाही या कॅम्पच्या माध्यमातून दिला जात आहे. डॉ. नरेश कासट, डॉ. राऊत यांच्यासह त्यांच्या सहाकाऱ्यांनी रुग्णाची तपासणी करून उपचार केले.
नागरिकांनी संपर्क साधावा
अनके गावात सर्दी, ताप, खोकला, निमोनिया आदी आजार असलेली व कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आहेत. काही ठिकाणी तर ही संख्या लक्षणीय आहे. तेव्हा आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. जिथे अँटिजन तपासणी शिबिर घ्यायचे असेल तेथील युवकांनी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील सभापती बळीराम गवते यांनी केले आहे.
===Photopath===
180521\18_2_bed_38_18052021_14.jpeg
===Caption===
बेलुरा येथे ॲन्टीजन तपासणी करण्यासाठी आलेले आरोग्य पथक व सभाती बळीराम गते आदी