शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

'ड्रोन'मुळे गावकरी जागे, तावडीत सापडले चोरटे; तिघांना गावकऱ्यांकडून बेदम चोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 8:06 PM

कानडीमाळी गावकऱ्यांनी चोरटे बदडले...तीने जखमी, एक फरार..

- मधुकर सिरसटकेज (बीड) :  तालुक्यातील कानडीमाळी गावावरून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान ड्रोन उडत असल्याने गावकरी जागे झाले. याच वेळी गावात आलेल्या एका जीपमधील संशयितांची चौकशी असता त्यात दरोडा टाकण्याच्या  तयारीत असलेले चोरटे गावकऱ्यांच्या हाती लागले. गावकऱ्यांनी तीन संशयित चोरटय़ांना बेदम मारहाण करून  पोलीसांच्या स्वाधीन केले. तर यावेळी एकजण फरार होण्यात यशस्वी झाला.

कानडी माळी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरुन लागल्यामुळे गावकरी घाबरून  जागे राहुन गस्त घालीत होते. यावेळी एक जीप ( एमएच 45 एन 3451) कानडीच्या बस स्टँडवर आली. गावकऱ्यांनी गाडीला वेढाघालून विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गावकऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता त्यात हत्यारे आढळून आले. गाडीत दरोडेखोर असल्याचा उलगडा होताच गावकऱ्यांनी आतील तिघांना ताब्यात घेत बेदम चोप देत बांधून ठेवले. तर अंधाराचा फायदा घेत एक चोरटा फरार झाला.  

सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांन देताच. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, राजू वाघमारे, चंद्रकांत काळकुटे, नितीन जाधव,  होमगार्ड बाळू थोरात, विजय वनवे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. राहुल विकास काळे ( 18 रा सरमकुंडी) , श्रावण महादेव काळे ( 20 रा केवड), अमोल सटवा घुले ( 21 ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड