शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:40 PM

शहरातील एका महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तुझ्याशी माझा काही संबंध नाही, तुझी जात वेगळी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली.

ठळक मुद्देशिवाजीनगर ठाण्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटीसह अत्याचार प्रकरणी गुन्हा

बीड : शहरातील एका महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तुझ्याशी माझा काही संबंध नाही, तुझी जात वेगळी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचार व अ‍ॅट्रोसिट्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक दगडू वैगुंडे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संबंधित महिलेचे यापूर्वी एक लग्न झालेले होते. त्यापासून तिला दोन अपत्ये आहेत. अशोक वैगुंडे याचा रिक्षा मुलीला शाळेत जाण्यासाठी या महिलेने लावला होता. यावेळी अशोकची व महिलेची ओळख झाली होती.दरम्यान, २०१५ साली अशोक त्या महिलेला म्हणाला, माझ्या पत्नीशी माझा संबंध नाही. मला तू आवडतेस. तुझ्याशी लग्न करीन. तुला घर देईल असे आमिष दाखवले. या आमिषाला ती महिला बळी पडली. त्यानंतर ते दोघेही एकत्र राहू लागले. यावेळी अशोकपासून पीडितेला एक मुलगीही झाली. त्यानंतर आपण लग्न कधी करायचे, असे पीडितेने वारंवार विचारल्यानंतर तुझी जात वेगळी आहे, तू खालच्या जातीची आहेस, यापुढे तू मला भेटू नकोस असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच २५ सप्टेंबर रोजी मारहाण करुन अत्याचार केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अशोक वैगुंडेविरुद्ध पीडितेच्या फिर्यादीवरुन अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी