अंबाजोगाई : समस्त हिंदू धर्मातील जातीभेदाचे निर्मूलन करून सामाजिक समरसता जोपासण्याचे काम विश्व हिंदू परिषद सातत्याने करीत आहे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केले.
खोलेश्वर महाविद्यालयाच्या कै. गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या ५७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. गोपाळ चौसाळकर होते. याप्रसंगी मंचावर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे, ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे यांची उपस्थिती होती.
यावेळी १९९२ च्या आयोध्या कारसेवेत सहभागी असणाऱ्या सौदामिनी आणि दामोदर शंकरराव राऊत या दाम्पत्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड रुग्ण उपचार पथक प्रमुख डॉ. अनिल मस्के, डॉ. विशाल लेडे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. अरुणा केंद्रे, परिचारिका स्वाती वालेकर, सामाजिक कार्यकर्ते श्याम सरवदे व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. मुकुंद कुलकर्णी, प्रा. संकेत तोरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. वैष्णवी देगावकर यांनी आभार मानले. जयेंद्र कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी भारतीय अनुसंधान परिषदेचे कार्यवाह डॉ. शरद हेबाळकर, दीनदयाळ बॅंकेच्या अध्यक्षा शरयू हेबाळकर, प्राचार्य मुकुंद देवर्षी, दिनेश परदेशी, संजय लोणीकर, प्रा. बिभीषण फड, रमाकांत सेलमोकर, बाळासाहेब गायके उपस्थित होते.
120921\img-20210903-wa0107.jpg
कोरोना योद्धा म्हणून सन्मान