आष्टी : आष्टी विधानसभा मतदारसंघ-२३१ अंतर्गत आष्टी तालुक्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फोटो नसलेल्या मतदाराचे फोटो जमा करणे, दुबार नावे वगळणे, चुका दूर करणे आदी काम सुरू आहेत. ज्या मतदारांच्या मतदार यादीत चुका असतील त्यांनी या मोहिमेत चुका दुरुस्त करून घेण्यासाठी तहसील कार्यालय व बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन नायब तहसीलदार प्रदीप पाडुळे यांनी केले आहे. आष्टी तालुक्यात एकूण २ लाख ५ हजार २४९ मतदार आहेत, यापैकी अजूनही १ हजार नऊशे ८५ मतदारांचे फोटो जमा झालेले नाहीत. ज्या मतदारांच्या मतदार यादीत नावे चुकणे, फोटो नसणे किंवा फोटो बदलणे अशा मतदारांनी तहसील कार्यालय आष्टी किंवा संबंधित बीएलओकडे देण्यात यावेत अन्यथा आपले नाव यादीतून वगळण्यात येईल. दुबार नावे असणाऱ्या मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असेही पाडुळे यांनी सांगितले.
मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला आष्टीत सुरुवात - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:45 AM