सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : इकडे भ्रष्टाचार होतो, तिकडे लाच मागितली जाते, अशी पोकळ चर्चा सर्वच करतात. मात्र प्रत्यक्षात पुराव्यानिशी तक्रार घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे कोणीच जात नाही. कार्यालयाला तक्रारी येत नसल्याने कारवायांची संख्याही कमीच आहे. सध्या या कार्यालयाला तक्रारींची प्रतीक्षा असून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.भ्रष्टाचार कमी व्हावा, लाच स्विकारणाऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी लाचलचुपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. बीडमध्येही पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम टिम कर्तव्य बजावत आहे. यासच टिमने गतवर्षी ३५ लाचखोरांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे लाचखोरांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यावर्षी मात्र तक्रार देण्यासाठी नागरिकच पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.आतापर्यंत ९ महिन्यात १७ कारवाया झाल्या आहेत. कारवायांची संख्या कमी असण्यास केवळ तक्रार नसणेच कारण असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.तक्रार आल्यानंतर आपले नाव उघड होते हा गैरसमज दूर करावा. एसीबीकडे तक्रार आल्यानंतर सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे तक्रार देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकुर, अमोल बागलाने, प्रदीप वीर, मनोज गदळे, कल्याण राठोड, बापुराव बनसोडे, भरत गारदे, सखाराम घोलप, सय्यद नदीम, गणेश म्हेत्रे हे कार्यरत आहेत.बडे मासे गळाला : कार्यालयाची दहशतयावर्षी कारवायांची संख्या कमी असली तरी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, पुरवठा अधिकारी एन.आर.शेळके, मत्स्य कार्यालयातील मत्स्यविकास अधिकारी असे बडे मासे गळाला लागले होते. त्यामुळे बड्या अधिकाºयांमध्ये दहशत आहे.एसपी, कलेक्टरकडे तक्रारभ्रष्टाचार, लाचेच्या प्रकरणांसंदर्भात एसीबीचे कार्यालय काम करते. परंतु अशा सर्व तक्रारी या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नागरिक करतात. वास्तविक पाहता या सर्व तक्रारी एसीबीकडे करणे गरजेचे आहे. कारण याची सखोल चौकशी होऊन प्रकरण निकाली लागण्याची दाट शक्यता असते.......आलेल्या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करतो. तसेच नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आमच्याकडून सर्वच माध्यमांतून जनजागृती व आवाहन केले जात आहे. भ्रष्टाचार संपविण्यासाठी नागरिकांनी विश्वासाने पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे. आमच्याकडे सर्व माहिती गोपनिय ठेवली जाते.- बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उपअधीक्षक, एसीबी बीड
बीडच्या ‘एसीबी’ला तक्रारींची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 12:16 AM
इकडे भ्रष्टाचार होतो, तिकडे लाच मागितली जाते, अशी पोकळ चर्चा सर्वच करतात. मात्र प्रत्यक्षात पुराव्यानिशी तक्रार घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे कोणीच जात नाही. कार्यालयाला तक्रारी येत नसल्याने कारवायांची संख्याही कमीच आहे. सध्या या कार्यालयाला तक्रारींची प्रतीक्षा असून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
ठळक मुद्देनागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन : तक्रार नसल्याने कारवायांची संख्या झाली कमी