दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दूर आहेत. या ऐतिहासिक धार्मिक स्थळांना शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी भाविकांतून होत आहे .केज शहराला ऐतिहासिक धार्मिक तीर्थस्थळांचा मोठा वारसा लाभलेला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वामी समर्थांच्या हयातीतील ५२ मठांपैकी एक मठ आहे. त्याचे बांधकाम १७९७ मध्ये स्वामी समर्थांच्या हयातीत करण्यात आले होते. या मठात स्वामी समर्थांच्या गादीवर बसलेल्या स्वामीसुताच्या हस्ते स्फटिकांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. याच मठात स्वामी समर्थांनी महारूद्रराव देशपांडे उर्फ नानासाहेब महाराज यांना फेटून मारलेल्या स्वामी समर्थांच्या चर्मपादुका , रक्तचंदनाच्या खडावा, हातातील काठी (दंड) , गोठा या स्वामी समर्थ वापरत असलेल्या सर्व वस्तू आहेत. शहराच्या पश्चिम बाजूस सर्व धर्मीयांचे दैवत असलेल्या ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गाही ऐतिहासिक श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.केज शहराला ऐतिहासिक धार्मिकतेचा प्राचीन वारसा लाभलेला असतानाही राज्य शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त नसल्याने आज ऐतिहासिक असलेली धार्मिक स्थळे विकासापासून कोसो दूर आहत. त्यामुळे या तीर्थस्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.उद्धवस्वामींचा मठ : भाविकांसाठी आकर्षणस्वामी समर्थांच्या मठासोबतच शहराच्या पूर्वेस समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य असलेले उद्धव स्वामी यांची जिवंत समाधी आहे.स्वामी समर्थांच्या आदेशानुसार मूळचे त्र्यंबकेश्वरजवळील टाकळी येथील रहिवासी उद्धवस्वामी रामदासी हे धर्मप्रचारार्थ केज शहरात आले असता त्यांनी राममंदिराची स्थापना करून काही काळ वास्तव्य केले.शहराच्या पूर्वेस असलेल्या पिसाटी नदीतीरी ते तप करत असताना पाहून निजामांने जिज्ञासापोटी त्यांची चौकशी केल्यानंतर उद्धव स्वामी बसलेल्या ठिकाणापासून दृष्टिक्षेपातील जमीन त्यांना इनाम म्हणून जाहीर केली. पुढे तप करत बसलेल्याच ठिकाणी उद्धव स्वामीनी जिवंत समाधी घेतली.
ऐतिहासिक स्थळांना तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:37 AM
शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दूर आहेत. या ऐतिहासिक धार्मिक स्थळांना शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी भाविकांतून होत आहे .
ठळक मुद्देकेज शहरातील धार्मिक स्थळांची दूरवस्था : सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना विकासासाठी हवीय शासकीय मदत