अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदी करण्यात येणारी तूर ठेवण्यास गोदाम नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच खरेदी केंद्रावर तूर खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथपणे सुरु आहे. चाळीस दिवसात ७ हजार ४०० शेतकºयांची ७० हजार २०१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांचा आकडा पाहता १२ हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत असून खरेदीची गती अशीच राहिली तर मेअखेरपर्यंत ही खरेदी सुरु ठेवावी लागणार आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी ४ लाख ३८ हजार ३२६ क्विंटल तूर खरेदी झाली होती. अनेक अडचणींचा सामना यंत्रणेसह शेतक-यांना करावा लागला होता. तर खरेदी केलेली तूर शासनाच्या बीडसह इतर जिल्ह्यातील गोदामात साठवणूक करावी लागली. यंदा ३९ हजार ६९४ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाल्याने व पाऊसपाणी चांगले असल्याने बंपर उत्पादन झाले आहे. यंदा केंद्रांवर अडीच लाख क्विंटल तूर खरेदी होण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यात गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे खरेदी केलेली तूर साठविण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.मागील वर्षी खरेदी केलेली तूर अद्याप गोदामात पडून असल्याने व शासन बाहेर काढत नसल्याने ही परिस्थिती कायम आहे.संपूर्ण तूर खरेदीला मे उजाडणार१ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात हमी दराने तूर खरेदी सुरु झाली. राज्यात १४ सर्वाधिक खरेदी केंद्र बीड जिल्ह्यात आहेत. १३ मार्चपर्यंत बीड येथील खरेदी केंद्रावर ९२२ शेतकºयांची ८ हजार ४२१. ४२ क्ंिवटल तूर खरेदी झाली.या केंद्रांवर खरेदी केलेली तूर साठवणुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असली तरी पुरेसे गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीची गती मंदावली आहे. ४० दिवसात ७० हजार २०१ क्ंिवटल तूर खरेदी झाली आहे.गोदामांची उपलब्धता राहिली असती तर हा आकडा वाढला असता, परंतु शासनाकडून गोदाम उपलब्ध करुन दिले जात नसल्याने ही परिस्थिती आहे.
उर्वरित तूर खरेदी कधी ?जिल्ह्यात तूर विक्रीसाठी १९ हजार २२८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आतापर्यंत ७४५० शेतकºयांची तूर खरेदी झाली आहे. त्यामुळे उर्वरित ११ हजार ७७८ शेतकºयांची तूर खरेदी कधी होणार असा प्रश्न आहे.
चणा खरेदी सुरुनाफेडच्या वतीने हमीदराने चणा खरेदी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांवर चणा खरेदी केली जाणार आहे. चणा विक्रीसाठी ५६८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असून नोंदणी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
हेक्टरी मर्यादा १० क्विंटल४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल चनासाठी हेक्टरी १० क्विंटल मर्यादा मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात चालू रबी हंगामात १ लाख १५ हजार ४१४ हेक्टर क्षेत्रात हरभरा लागवड करण्यात आली आहे.
भाव जास्त; पण मर्यादा कमी४या वर्षी शेतक-यांनी हरभ-याचे एकरी ६ ते ७ क्विंटल इतके उत्पादन घेतले आहे. हे पाहता हेक्टरी मर्यादा किमान १५ क्विंटलपर्यंत वाढवावी अशी मागणी गुंजाळा येथील आश्रुबा घुगे, गुंदावाडीचे केशव माने, आडगावचे गोपाल बियाणी या शेतक-यांनी सांगितले.
बाजारापेक्षा शासनाचा हमीभाव जास्तया वर्षी खुल्या बाजारात चनाचे भाव ३३०० पासून ३५०० रुपये क्विंटल आहेत. त्या तुलनेत शासनाने दिलेला हमीभाव क्विंटलमागे ८०० रुपयांनी जास्त आहे. भाव चांगला पण हेक्टरी मर्यादा कमी असल्याने नवा प्रश्न निर्माण होणार आहे.