बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
खरीप हंगाम पेरणी, लागवडीपूर्वी बोंडअळीचे अनुदान मिळावे अशी मागणी शेतकºयांनी वेळोवेळी शासनाकडे केली होती. परंतू खरीप पेरणी व या हंगामातील कापूस लागवड झाल्यानंतर देखील शासनाकडून दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रक्कम देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शासनाने जिल्ह्यातील बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी ८५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी ६८ कोटी ४२ लक्ष रूपये शासनाने मंजूर केले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील सर्व रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम देखील धिम्या गतीने सुरू असल्याचे शेतकºयांकडून सांगण्याता आले. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.
दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रकमेची मागणी जिल्हा शासनाच्या वतीने ८५ कोटी रूपये करण्यात आली आहे. परंतु ही अनुदानाची रक्कम राज्य शासनाने आणखी मंजूर न केल्यामुळे बोंडअळी बाधीत शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बोंडअळीचे अनुदान राज्य शासनाने तात्काळ मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शेतकºयामधून जोर धरू लागली आहे.६८ कोटींवरच केली बोळवणबोंडअळीबाधित शेतकºयांना अनुदानापोटी २५६ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी ३ टप्प्यात रक्कमेची मागणी केली होती. मात्र पहिल्या टप्प्यात ८५ कोटी रूपयांची मागणी करून देखील ६८.४८ कोटी रक्कम जिल्ह्याला देण्यात आले. उर्वरीत रक्कम मिळणार आहे का नाही असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागले आहेत.