धारुर: धारूरमधील ऐतिहासीक किल्ल्याची खारी दिंडु भागातील तीन महिन्यांपूर्वी बांधलेली भिंत पुन्हा कोसळली आहे. दुरुस्तीनंतर भिंत पडण्याची ही पाचवी घटना आहे. यामुळे पुरातत्व विभागाने सात कोटी खर्च करुन केलेल्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील धारुरमध्ये असलेल्या ऐतिहासीक किल्ल्याची भिंत पुन्हा एकदा कोसळल्याची घटना घडली आहे. सततच्या पाठपूराव्यानंतर पुरातत्व विभागाने धारुरच्या किल्ल्यासाठी दोन टप्प्यात सात कोटी रुपयाचा निधी किल्ला दुरुस्तीसाठी दिला होता. हे दुरुस्तीचे काम सुरू असताना एक भिंत ढासळली त्यानंतर नविन काम केलेल्या तिन भिंती ढासळल्या.
आता या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण, संबंधीत गुत्तेदाराची पाच वर्षे देखभाल दुरुस्तिची जबाबदारी असल्याने या भिंतीची दुरुस्ती पुन्हा करण्यात आली मात्र दुरुस्ती केलेली एक भिंत पुन्हा कोसळल्याने या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता याकडे पुरातत्व विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.