Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने तपास वाढवला आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंडचा आरोप असलेले वाल्मीक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याच दिवशी बीड न्यायालयात हजर केले, न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. वाल्मीक कराड सध्या सीआयडी कस्टडीमध्ये आहे. दोन दिवसापासून वाल्मीक कराड याची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. कराड याला रात्री ऑक्सिजन मास्क लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वाल्मीक कराड याला पहिल्या दिवशी थोडावेळ ऑक्सिजन मास्क लावावा लागला. यानंतर आता दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन मास्क लावला. कराड याला दररोज गोळ्या सुरू आहेत. सीआयडीकडे आत्मसमर्पण होत असताना त्याने सोबत औषध आणली आहेत. वाल्मीक कराड याची सीआयडी कस्टडीमध्ये डॉक्टरांनी तपासणी केली.
तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मीक कराडने सीआयडी कोठडीत पहिल्या दिवशी जेवण घ्यायला नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नाश्ता घ्यायला नकार दिला. कराड याला शुगर आणि बीपीचा त्रास आहे. अधिकाऱ्यांनी कराड याला खाण्यासाठी आग्रह केला. यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास जेवण केले. वाल्मीक कराड याने अधिकाऱ्यांकडे काही मागण्या केल्या आहे. त्या त्याने फक्त भात किंवा खिचडीची मागणी केली आहे. तर दोन्ही रात्री तो ऑक्सिजन मास्क लावून झोपला होता अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड शरण आल्यानंतर सीआयडी अॅक्टीव्ह झाली आहे. सीआयडी आता सुदर्शन घुले याच्यासह अन्य आरोपींच्या मागावर आहे. तपासाची चक्रे वाढवली आहेत. चार राज्यात पोलिसांनी पथके पाठवली आहेत. आरोपींकडे मोबाईल फोन जवळ नसल्यामुळे शोध लागलेला नाही.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा
"मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाल्मीक कराड याचा पोलिस एन्काऊंटर करु शकतात, असं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, बीड मधील पोलिस ठाण्यात बेड घेऊन गेल्याचे फोटो समोर आले. याआधी पोलिस ठाण्यात बेडवर झोपल्याची माहिती नाही. कालच्या प्रकरणात पोलिसांसाठी असल्याच सांगितलं आहे. हे वाल्मीक कराडचे लाड आहेत. पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याला झोपण्यासाठी घेऊन गेले आहेत का? या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.