गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर जीवघेणा परिणाम होतो आहे. कचरा व्यवस्थापनासाठी थ्री आर (रिड्यूज, रेफ्यूज, रिसायकल) सूत्राचा वापर जागरूकतेने करावा, कारण कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ज्यातून स्वच्छ, सुंदर, निरोगी पृथ्वीची निर्मिती होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक दत्ता पत्की यांनी दिली. दीनदयाल शोध संस्थान संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा वित्त पोषित जनशिक्षण संस्थान, बीडद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ताकडगाव येथे ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, एका बाटलीमध्ये किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळाएवढ्या कॅरिबॅग मावतात. त्या विटांचा आपण शोभिवंत कामासाठी उपयोग करू शकतो. त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित लाभार्थींनी प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता गिरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, प्रमुख पाहुणे दत्ता पत्की, उपसरपंच विद्या मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगाधर देशमुख यांनी व्यवसाय कौशल्यातून स्वयंरोजगारनिर्मितीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्रिंबक मोटे, नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सीमा मनूरकर यांनी केले. अनुजा मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका रुक्मिणी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
210721\2129sakharam shinde_img-20210721-wa0010_14.jpg