बीड : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी २७ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १६ गावांची कामे पंचायत समितीच्या नरेगा विभागामार्फत करण्यात येणार होती. मात्र, पंचायत समितीच्या वतीने थोड्या प्रमाणात कामे करुन ती बंद क रण्यात आली आहेत, त्या गावातील कामे करण्याची तयारी कृषी विभागाने दर्शवली आहे, मात्र पंचायत समितीकडून कृषी विभागाला देण्यात आलेल्या पत्रामध्ये त्रुटी असल्यमुळे अपूर्ण कामे पुन्हा सुरु करता येत नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे,जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थीती निवारणासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही योजना कृषी विभाग व पंचायतसमिती स्तारावर नरेगाच्या माध्यमातून राबवली जात होती. मात्र पंचायत समितीच्या नरेगाअंतर्गत मंजूर असलेल्या १६ गावांमध्ये काही प्रमाणात कामे करुन ती बंद केली आहेत्. ही बंद असलेली जलयुक्त शिवारची कामे पुन्हा सुरु करण्याची मागणी संबंधीत गावातील नागरिकांनी केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण कामे करण्याची तयारी कृषी विभागच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. मात्र ज्या गावांमध्ये नरेगाअंतर्गत कामे झाली आहेत. ती कोणत्या गट नंबर मध्ये व किती प्रमाणात झाले याची माहिती व कामे करण्यासंदर्भात पत्र देण्याची मागणी कृषी विभागाने केली होती. पंचायत समितीकडून १६ गावांच्या संदर्भात कृषी विभागाला पत्र दिले आहे. परंतू यामध्ये कामे अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळेही कामे नेमकी कुठे झाली याविषयी संभ्रम आहे त्यामुळे कामे सरु करण्यास विलंब होत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.पं.स. नरेगांतर्गत कामे झालीच नाहीत ?अनेक गावांमध्ये पं.स. नरेगाअंतर्गत जलयुक्त शिवारची कामे न करताच पैसे उचलल्याची सूत्रांची माहिती आहे. २०१४ ते १७ या वर्षातील कामे आहेत, यामधील काही कमे अपूर्ण तर काही पूर्ण झाल्याचे नरेगाच्या संकेतस्थळावर दिसत आहे. त्यामुळे संबंधीत गावातील नागरिकांनी या कामांची चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी केली आहे.
समन्वयाचा अभाव; नागरिकांमध्ये संतापनरेगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची माहिती, तसेच कोणत्या गट नंबर मध्ये जलयुक्तची किती कामे केली आहेत, याविषयी पत्राद्वारे माहिती देऊन एक महिना झाला आहे, अशी माहिती बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुरुकमारे यांनी दिली. परंतू या दोन्ही विभागातील समन्वयाच्या अभावामुळे १६ गावांमधील जलयुक्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.