लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे. १५ आॅगस्टपासून तब्बल ४७ दिवस पाऊस न झाल्याने पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिल्हयातील सर्वच धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र उपलब्ध साठादेखील कमी असल्याने आॅक्टोबरनंतर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने प्रशासनाला आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे. मात्र अद्यापही आॅक्टोबरमध्ये पाऊस होईल या भरवशावर हालचाली सुरु झाल्याचे दिसत नाही. पाऊस नाही, पिके गेली, धरणे कोरडी पडू लागली, पुढचा हंगामही धोक्यात आला अशा परिस्थितीकडे शासनाने गांभिर्याने पाहण्याची वेळ आली आहे.बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६६.३६ मिमी इतके आहे. मागील वर्षी ६०६. ७० मिमी पाऊस झाल्याने पीक परिस्थिती तसेच पाण्याची उपलब्धता होती. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिल्याने गंभीर संकटाची चाहुल शेतकºयांसह सर्वसामान्याला लागली आहे. जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मात्र यंदा माजलगाव धरणात पाणीसाठा नसल्यात जमा आहे. तर मांजरा धरणात १.२१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांवरच निम्म्या जिल्ह्याची भिस्त आहे. १६ मध्यम आणि १२६ लघु प्रकल्पांतील परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. या पार्श्वभूमीवर नगर पालिका, नगर पंचायतींनी पाणी पुरवठ्यात कपात करणे सुरु केले आहे.पाऊस नसल्याने बाजारही शांतपुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. उलाढाल थंडावली असून वर्दळ थांबल्यागत स्थिती पहायला मिळते.थोड्याफार पाण्यावर भाजी पिके घेणाºया शेतकºयांना बाजारात विक्रीसाठी येणे परवडत नसल्याने तेही हवालदिल झाले आहेत.पुरेसे पाणी नसल्याने आहे ती बांधकामे थांबविण्याची वेळ आली आहे. आॅक्टोबरमध्ये पाऊस पडेल या आशेवर आभाळाकडे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठामोठे २, मध्यम १६, लघु १२६१ मध्यम व ७ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के१ मोठा ,४ मध्यम, १८ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी१ मध्यम, ४ लघु प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त१ लघुप्रकल्पात ५० ते ७५ टक्के८ मध्यम, ७७ लघु प्रकल्प जोत्याखाली२ मध्यम १९ लघुप्रकल्प कोरडेसध्या उपलब्ध साठा ३७.७५७ दलघमीएकाही प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा नाही
बीड जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:23 AM
जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे.
ठळक मुद्देसर्व प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित : ८६ प्रकल्प जोत्याखाली, २१ प्रकल्प कोरडे, उपायांची गरज