धारूर : तालुक्यात वॉटर कप स्पर्धेने शेवटच्या टप्प्यात जोर धरला असून, दहा ते बारा गावात जोरदार काम सुरू आहेत. शेवटच्या टप्प्यात या गावांमध्ये श्रमदानाची लोकचळवळ जोर धरत असल्याचे चित्र दिसून येत आहेतालुक्यात चौथ्या वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील दहा ते बारा गावांनी भाग घेतला असून, या गावामध्ये श्रमदान असं यंत्र कामही जोरदार सुरू आहे. शुक्रवारी अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आम्ला येथे श्रमदानात भाग घेतला व यंत्रकामासाठी देणगी दिली. मोरफळी येथे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सहभाग घेऊन या ठिकाणी या गावाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मोठेवाडी येथे किल्ले धारूर यूथ क्लब च्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून या ठिकाणी ७ हजार रुपये इंधन खचार्साठी क्लबच्या वतीने देण्यात आले. सोनीमोहा याठिकाणी कायाकल्प प्रतिष्ठान व जलमित्रांनी श्रमदानात भाग घेतला.शहरी भागाचे ग्रामीण भागात श्रमदानग्रामीण भागामध्ये जाऊन शहरी भागातील नागरिक श्रमदानात भाग घेत असल्यामुळे या ग्रामीण भागातील लोकांना या स्पर्धेत बळ मिळत असून, श्रमदानात लोकसहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वॉटर कप स्पर्धेची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:45 PM
तालुक्यात वॉटर कप स्पर्धेने शेवटच्या टप्प्यात जोर धरला असून, दहा ते बारा गावात जोरदार काम सुरू आहेत.
ठळक मुद्देशेवटचा टप्पा : मोठेवाडीत यूथ क्लब, तर मोरफळीत मानवलोकचा श्रमदानात सहभाग