पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यासह माजलगाव धरण क्षेत्रात पडलेल्या दुष्काळामुळे धरणातीलपाणी आॅक्टोबरमध्येच मृतसाठ्यातच गेले असताना या धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होवू नये म्हणून पैठणच्या धरणातील सी.आर. ने कोलत्याचीवाडी येथून पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले. महिनाभर या पाण्याचा विसर्ग एकूण ३४ दलघमी पाणी येणार आसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.माजलगाव धरणक्षेत्रात या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली नसून, रोज धरणातील पाण्याचा बीड शहरासह माजलगाव शहर आणि ११ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे. त्यात होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे.माजलगाव धरणाची पाणी पातळी एकूण ११.०२ टीएमसी असून २२ डिसेंबरपर्यंत धरणात मृतसाठा होता. त्यामुळे भविष्यात माजलगाव धरणावर अवलंबून असणाºया गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह परळी येथील औद्योगिक विद्युत प्रकल्पासाठी पाण्याची गरज होती.या बाबत माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री पंकजा मुंडे, माजलगावचे आ. आर. टी. देशमुख यांच्याकडे तसेच तहसील प्रशसनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पैठण धरणातील पाणी माजलगाव धरणात सोडण्यात आले. २१ डिसेंबर पासून पैठण धरणाच्या कोलत्याचीवाडी येथून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात सोडलेले पाणी धरणापर्यंत येण्यास जवळपास चार दिवस लागले आहेत. २४ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास माजलगाव धरणात ९०० क्युसेसने सोडले आहे.या मुळे धरणातील पाणी पातळीत निश्चित वाढ होऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने माजलगाव तालुक्यात समाधान व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.
‘जायकवाडी’चे पाणी ‘माजलगावा’त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:55 AM